अर्थसंकल्प २०२६ : नव्या अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

Foto
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी २०२६) देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प (  २०२६) सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या १२ वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
 
काय स्वस्त झालं?
 
कॅन्सरची औषधं
मधुमेहाची औषधं
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
ईव्ही बॅटरी 
सौर पॅनेल
वैद्यकीय उपकरणे
एलसीडी, एलईडी
भारतात बनवलेले कपडे
ईव्ही वाहने
मोटारसायकल
फ्रोझन मासे
ईव्ही लिथियम बॅटरी
लिथियम आयन बॅटरी
अपघात विमा

 काय महाग झालं?
 
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले
बूटं
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स